रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करतांना साधकाच्या मनात आलेले विचार

‘माझ्या मनात विचार आला, ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’, असे- प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटले आहे. ‘मन प्रकृतीशी चिकटलेले असते. डोळे हे त्याचे माध्यम आहेत. मनाला अंतःचक्षू आणि भावचक्षू यांनी चैतन्याशी म्हणजे ईश्वराशी जोडले की, ते बाह्य प्रकृतीपासून निर्लिप्त होऊन परब्रह्म स्वरूपात विलीन होऊ लागते…

स्वतःकडून झालेल्या चुकीसाठी प्रायश्चित घेणे आणि मनाला स्वयंसूचना देणे, यांमुळे साधिकेला स्वतःमध्ये पालट जाणवणे

‘माझ्याकडून एक चूक झाली होती. तेव्हा ‘माझ्याच स्वभावदोषामुळे माझ्याकडून चूक झाली आहे आणि ती चूक सुधारली पाहिजे’, असे मला वाटले. देवाने त्यावर मला प्रायश्चित घेण्यास आणि ती ज्या स्वभावदोषामुळे झाली, त्यावर मनाला स्वयंसूचना देण्यास सुचवले…

श्रीकृष्णाशी सूक्ष्मातून संवाद साधणारी देवद (पनवेल) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दुर्वा नित्यानंद भिसे (वय ८ वर्षे) !

दुर्वाला कधी कंटाळा येतो, तेव्हा ती श्रीकृष्णाशी बोलते. ती त्याला मनातील प्रसंग सांगते. एकदा तिला इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाचे उत्तर येत नव्हते. तेव्हा तिने त्या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्णाला विचारले. त्यानंतर तिला आतून जे उत्तर मिळाले, ते तिने उत्तरपत्रिकेत लिहिले आणि ते उत्तर योग्य होते.