Supreme Court On AMU : अलीगड मुस्लिम विद्यापिठाचा ‘अल्पसंख्यांक संस्था’ दर्जा कायम !

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ७ न्यायाधिशांच्या खंडपिठाने राज्यातील अलीगड येथील ‘अलीगड मुस्लिम विद्यापिठा’ला दिलेला ‘अल्पसंख्यांक संस्थे’चा दर्जा अबाधित ठेवला आहे. वर्ष २००५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने विद्यापिठाला ‘अल्पसंख्यांक संस्था’ म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता. या निर्णयाला विद्यापिठाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या विद्यापिठाला राज्यघटनेच्या अनुच्छेद ३० अंतर्गत अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळाला आहे.

वर्ष १९२० मध्ये ब्रिटीश सरकारच्या साहाय्याने मुसलमानांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठ कायदा करून या विद्यापिठाची स्थापना केली. विद्यापिठाच्या विरोधकांचे म्हणणे आहे की, राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी या विद्यापिठाच्या स्थापनेसाठी १९२९ मध्ये ३.०४ एकर भूमी दान केली होती. अशा स्थितीत या विद्यापिठाचे संस्थापक सर अहमद खान नव्हे, तर हिंदु राजा महेंद्र प्रताप सिंग आहेत.