सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथे मदरशातून परतत असलेल्या ४ मुलींवर भटक्या कुत्र्यांनी आक्रमण करून त्यांना गंभीर घायाळ केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हे प्रकरण सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह येथे असलेल्या सांगतेडा गावचे आहे. जैनब (६), सुमैया (४), सदना (५) आणि नबिया (६), अशी घायाळ झालेल्या मुलींची नावे आहेत.
🚨UP Stray Dog Attack
🛑Saharanpur, Uttar Pradesh : Fatal attack by stray dogs on 4 girls in a madrasa
👉Despite strict laws against stray dogs, such incidents continue to surface repeatedly. This is a result of the lack of strict enforcement of the law. Therefore, action… pic.twitter.com/8ysIhmWelD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 8, 2024
कुत्र्यांनी दोन मुलींच्या चेहर्याचे मांस तोडून खाल्ले, तसेच त्यांची छाती, हात आणि पाय यांवर गंभीर जखमा केल्या. मुली किंचाळल्याने आजूबाजूचे लोक त्यांना वाचवण्यासाठी धावले. त्यांनी लाठ्या-काठ्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून मुलींना सोडवले.
संपादकीय भूमिकाभटक्या कुत्र्यांच्या विरोधात कठोर कायदा असूनही अशा घटना वारंवार समोर येत असतात. कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम होय. यासाठी आता संबंधित प्रशासकीय अधिकार्यांवरच कारवाई झाली पाहिजे ! |