ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांचे पद सोडण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी लिबरल पक्षाच्या २० खासदारांनी त्यांना पंतप्रधानपद सोडण्याची, तसेच पुढील वर्षी होणारी निवडणूकही लढवू नये, अशा सूचना केल्या होत्या. ट्रुडो यांची ढासळती लोकप्रियता हे त्यामागील कारण होते. तसेच काही दिवसांपूर्वी स्थानिक निवडणुका झाल्या होत्या. त्यात ट्रुडो यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. ‘ट्रुडो यांना देशांतर्गत विरोध वाढत आहे’, असे सत्ताधारी पक्षातील खासदारांना वाटते. ट्रुडो यांनी मात्र पुढील वर्षी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. एका पत्रकाराने त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी ही माहिती दिली. ट्रुडो यांच्या या घोषणेवर त्यांच्या पक्षातील एका खासदाराने निराशा व्यक्त केली आहे.
संपादकीय भूमिकाखलिस्तानी आतंकवाद्यांना पोसणारे ट्रुडो यांचे राजकीय अस्तित्व कॅनडातील जनतेने पुढील वर्षीच्या निवडणुकीत संपवल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |