
कोल्हापूर – गेल्या आठवड्यापासून सामाजिक माध्यमांवर धर्मांधांकडून चिथावणीखोर वक्तव्ये प्रसारित करण्यात येत आहेत. ‘एकच मिशन कोल्हापूर’, अशा आशयाचे ‘स्टेटस’ लावण्यात आले होते. तरी अशा संशयितांवर पोलिसांनी अन्वेषण करून कारवाई करणे अपेक्षित होते. विशाळगड आंदोलनातील शिवभक्तांवर नोंद केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत. त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शिवभक्तांच्या पाठीशी राहू. ‘एम्.आय.एम्’चे माजी खासदार इम्तियाज जलील हे १९ जुलैला कोल्हापूर येथे येणार नसल्याचे पोलिसांनी कळवल्याने आम्ही १९ जुलैचा ‘कोल्हापूर बंद’ मागे घेत आहोत, अशी माहिती सकल हिंदु समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेस सर्वश्री सुनील सामंत, महेश जाधव, गजानन तोडकर, सुजित चव्हाण, उदय भोसले, संदीप सासणे, निरंजन शिंदे, आशिष लोखंडे, दीपक देसाई, अनिल दिंडे, शिवानंद स्वामी, शिवाजीराव जाधव यांसह अन्य उपस्थित होते.
पश्चिम रेल्वेत ५ वर्षांत तिकीट दलालीची २ सहस्र ८८५ प्रकरणे : अटक झालेल्यांची माहितीच उपलब्ध नाही !
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील प्रश्नपत्रिका फुटीची तक्रार बोगस ! – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बदलापूर येथे बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा !
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !