प्रभु श्रीरामाविषयी वादग्रस्त विधानाचे प्रकरण
मुंबई – ‘प्रभु श्रीराम हे मांसाहारी होते’, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यात विविध ७ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेले गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाने शिर्डी येथे वर्ग केले आहेत. १८ जुलै या दिवशी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. मुंबई, पुणे, शिर्डी, ठाणे, यवतमाळ आदी विविध ठिकाणी हे गुन्हे नोंद झाले होते. हे गुन्हे ठाणे जिल्ह्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात किंवा नवघर पोलीस ठाण्यात वर्ग करावेत, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.