मुंबईत विठ्ठलाचा मुकुट चोरणार्‍याला अटक आणि सुटका !

बोरिवली (मुंबई) – येथील विठ्ठल मंदिरातून श्री विठ्ठलाच्या मूर्तीवरील मुकुटाची चोरी झाली आहे. या प्रकरणी प्रकाश शर्मा (वय २६ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. त्याने ही चोरी केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. (मंदिरात चोरी करणार्‍यांना कठोर शिक्षा कधी होणार ? – संपादक)