मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – सातारा येथील प्रतापगडाच्या विकासासाठी राज्यशासनाने ‘प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली आहे. भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हे प्राधिकरण काम करणार आहे. अध्यक्षांसह १७ सदस्य या प्राधिकरणामध्ये कार्यरत असतील. शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक श्री. नितीन शिंदे, समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, अभिनेते श्री. शरद पोंक्षे, गड-दुर्ग अभ्यासक श्री. सदाशिव टेटविलकर, श्री. सोमनाथ धुमाळ, श्री. चंद्रकांत पाटील हे सदस्य आहेत.