सरकारचा निर्णय हिंदुत्वाला बळकटी देणारा ! – नितेश राणे, आमदार

दौंड उपविभागाचे उपअधीक्षक स्वप्नील जाधव हे सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत होते. अप्रत्यक्षपणे ते जिहादींना साहाय्य करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याविषयी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती.

अनधिकृत शाळेत मुलांना प्रवेश घेऊन देऊ नका ! – पुणे जिल्हा परिषद

अनधिकृत शाळांमध्ये पुणे शहरातील १४, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ आणि पिंपरी-चिंचवडमधील ११ शाळांचा समावेश आहे.

अनावश्यक साखळी ओढून रेल्वे थांबवणार्‍यांवर कारवाई !

जनतेला स्वयंशिस्त न लावल्याचा परिणाम ! अशा प्रकारची कारवाई सतत करत राहून जनतेला शिस्त लावणे आवश्यक !

नागरिकांना काळजी घेण्याचे सातारा जिल्हा प्रशासनाचे आवाहन !

हवामान विभागाने सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे येथील ‘आय.एल्.एस्. विधी महाविद्यालया’त जातीयवाद आहे का ? याचे अन्वेषण करा ! – मुंबई उच्च न्यायालय

शहरातील प्रतिष्ठित ‘आय.एल्.एस्. विधी महाविद्यालया’मध्ये (इंडियन लॉ सोसायटी) जातीयवाद आहे का ? याचे अन्वेषण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

नवी मुंबई येथे ८ कोटी रुपयांचे ८ टन रक्तचंदन जप्त, ५ जणांना अटक !

नवी मुंबईतील ‘जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट’च्या बंदरातून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे कार्यालयातील पथकाने कारवाई करत ८ टन रक्तचंदन जप्त केले. या प्रकरणी पथकाने निर्यातदार, दलाल, गोदाम व्यवस्थापक आणि वाहतूकदार यांसह ५ जणांना अटक केली आहे.

बुद्धीप्रामाण्यवादी, साम्यवादी, सर्वधर्मसमभावी हेच देशाचे आणि धर्माचे खरे शत्रू !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची देवावरची श्रद्धा नष्ट झाली. सर्वधर्मसमभाववाद्यांमुळे हिंदूंना हिंदु धर्माची अद्वितीयता कळली नाही आणि साम्यवाद्यांमुळे हिंदू देवाला मानेनासे झाले. यांमुळे देवाची कृपा न झाल्याने हिंदू आणि भारत यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’

या पोलिसांना फाशीचीच शिक्षा करा !

‘इस्रो’चे वैज्ञानिक नंबी नारायणन् यांच्यावरील हेरगिरीचे आरोप खोटे होते. केरळ पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका माजी अधिकार्‍याने हा कट रचला, असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. या प्रकरणी २ माजी पोलीस महासंचालकांना अटक करण्यात आली आहे.

‘दैनिक सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : भक्तीभाव

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १३ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !