मालवण येथे गटाराच्या बांधकामासाठी ७ दिवस रस्ता बंद

मालवण – प्रतिवर्षी पावसाळ्याच्या कालावधीत शहरातील ‘हॉटेल स्वामी’ ते ‘मामा वरेरकर नाट्यगृहा’पर्यंतच्या मार्गावर पाणी साचते. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे पावसाळ्यात साचणार्‍या पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे गटार बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ‘वझे कॉर्नर, मामा वरेरकर नाट्यगृह ते भरड’ हा मार्ग १४ जूनपासून ७ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक, पर्यटक, वाहनधारक आणि विद्यार्थी यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. सर्वांनी आवश्यक ती सावधानता बाळगावी आणि मालवण नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन बांधकाम विभागाने केले आहे.

संपादकीय भूमिका 

पावसाळा चालू झाल्यावर गटार बांधणे; म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखेच !