सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रथम भेटीतच भावावस्था अनुभवणारे मडगाव, गोवा येथील होमिओपॅथी वैद्य अशोक बोरकर !

‘मी २५ वर्षांपासून मडगाव, गोवा येथील होमिओपॅथी वैद्य अशोक बोरकर (वय ५६ वर्षे) यांच्या संपर्कात आहे. तेव्हापासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अधून-मधून होमिओपॅथी वैद्य बोरकर यांची औषधे घेत आहेत. या २५ वर्षांच्या कालावधीत होमिओपॅथी वैद्य अशोक बोरकर यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी केवळ २ वेळा भ्रमणभाषवर बोलणे झाले होते. एकदा वैद्य बोरकर यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी वैयक्तिक भेट झाली. त्या वेळी त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भेटीनंतर एक वेगळीच अवस्था अनुभवत आहे’, असे होमिओपॅथी वैद्य अशोक बोरकर यांनी सांगणे

वैद्य अशोक बोरकर

हल्लीच वैद्य बोरकर यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी वैयक्तिक भेट झाली. त्या भेटीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे त्यांच्याशी वैद्यकीय विषयावर आणि अध्यात्मावरही बोलणे झाले. या भेटीनंतर वैद्य अशोक बोरकर मला म्हणाले, ‘‘मला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे सतत पहातच रहावे’, असे वाटत होते. आज मी एक वेगळीच अवस्था अनुभवत आहे. यापूर्वी मी अशी अवस्था कधी अनुभवली नव्हती. माझ्या संपूर्ण अंगावर रोमांच येत आहेत.’’

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची अनुभूती येणे

डॉ. मनोज वसंतलाल सोलंकी

मडगावहून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येतांना मी आणि वैद्य बोरकर वैद्यकीय विषयावर बोलत होतो; पण आश्रमातून मडगावला परत जातांना आमचे ‘अध्यात्म आणि साधना’ या विषयावर बोलणे झाले. ‘पहिल्याच भेटीत एखाद्या व्यक्तीची भावजागृती होऊन त्या व्यक्तीला भावावस्था अनुभवता येणे आणि त्याला ‘अध्यात्म’ विषयात गोडी निर्माण होणे’, हे असामान्य असल्याचे मला या वेळी अनुभवता आले. या प्रसंगातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक सामर्थ्य माझ्या लक्षात आले.’

– डॉ. मनोज वसंतलाल सोलंकी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ५८ वर्षे), मडगाव, गोवा. (३.४.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक