डोंबिवलीतील घातक रासायनिक कारखान्यांचे अंबरनाथ येथे स्थलांतर होणार !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – डोंबिवली एम्.आय.डी.सी.तील घातक रासायनिक कारखान्यांचे अंबरनाथमधील जांभवली आणि पाताळगंगा येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याचे धोरण ठरवण्यासाठी उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी कारखाने अन्यत्र हालवण्याचे आदेश दिल्याप्रमाणे उद्योगमंत्र्यांनी आढावा घेऊन कारवाईस प्रारंभ केला आहे.

स्थलांतराचे काम आचारसंहितेमुळे थांबले होते; मात्र आता उद्योगांना जागा वाटपासाठी निवडणूक आयोगाकडे अनुमती मागितली जाणार आहे.