ठाणे – ठाणे रेल्वेस्थानकावर ३० मे या दिवशीपासून ६२ घंट्यांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ३० मे रात्रीपासून चालू होईल. ‘डाऊन फास्ट लाईन’साठी ६२ घंट्यांचा, तर ‘अप स्लो लाईन’वर १२ घंट्यांचा ब्लॉक असणार आहे. येथील रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ५ आणि ६ यांची रुंदी वाढवण्यासाठी हा ब्लॉक असेल.
१ आणि २ जूनला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकात ३६ घंट्यांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. स्थानकात १० आणि ११ क्रमांकांच्या फलाटांची लांबी वाढवण्यासाठी हा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. फलाटाचा विस्तार केल्यानंतर १६ किंवा त्यापेक्षा जास्त डब्यांच्या गाड्या या स्थानकात थांबवता येतील. या ब्लॉकसाठी अनेक लोकल गाड्या आणि एक्सप्रेस रहित करण्यात येणार आहेत.