मुंबईतील दुःस्थिती !
मुंबई – मुंबईत प्रत्येकी ४ शौचकुपांमागे केवळ १ शौचकुपाचा वापर महिलांकडून केला जात आहे. एका सार्वजनिक शौचालयाचा वापर करणार्या पुरुषांची संख्या ७५२, तर स्त्रियांची संख्या १ सहस्र ८२० आहे. एकूणच सार्वजनिक शौचालये झोपडपट्टीवासियांच्या संख्येच्या तुलनेने अपुरी आहेत, असे सांगणारा अहवाल ‘प्रजा फाउंडेशन’ने सादर केला. ६९ टक्के शौचालयांमध्ये पाणीजोडणीच नाही.
संपादकीय भूमिका :‘प्रजा फाऊंडेशन’च्या अहवालातून हे वास्तव उघड झाले; मात्र ते प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही ? |