कर्नाटकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह !

धर्मांतरामुळे हत्या किंवा आत्महत्या असल्याचा संशय !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील कोप्पळ जिल्ह्यातील होसलंगापूर गावात एकाच कुटुंबातील तिघांचा गूढ मृत्यू झाला होता. यामागे धर्मांतर असल्याचा आरोप केला जात आहे. रामेश्‍वरी (वय ५० वर्षे), तिची मुलगी वसंता (वय ३२ वर्षे) आणि नातू साईधर्मतेजा (वय ५ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय आहे. वसंताचा पती आरिफ पसार आहे.

२ वर्षांपूर्वी पतीपासून विभक्त झालेल्या वसंताने तिचा सहकारी आरिफ समवेत विवाह केला होता. आरिफ या तिघांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडत असल्याचा आरोप वसंताच्या नातेवाइकांनी केला. वसंता आणि तिच्या आईने धर्मांतर करण्यास नकार दिल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. आरिफ तिच्यावर अत्याचार करत होता.