Pakistan Attacks On Christians : पाकिस्तानमध्ये कुराणच्या अवमानाच्या आरोपावरून ख्रिस्त्यांच्या घरांवर आक्रमण

नासिर नावाच्या एका ख्रिस्त्यासह दोघांनी कुराण जाळल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवत तेथील मुसलमान समुदायाने परिसरातील ख्रिस्त्यांच्या घरांवर आक्रमण केले.

Rajkot Fire 28 Dead :  राजकोट (गुजरात) येथील भीषण आग : १२ मुलांसह २८ जणांचा मृत्यू

‘गेमिंग झोन’चा मालक आणि तेथील व्यवस्थापक यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मालकाने ‘गेमिंग झोन’ चालवण्यासाठी अग्नीशमन दलाची अनुमती घेतली नव्हती.

 रत्नागिरी जिल्ह्यात १० जूनपर्यंत मनाई आदेश

निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 तुरंबव (चिपळूण) येथे श्री शारदादेवी मंदिरात मंगलमय वातावरणात पार पडला नवचंडी याग

यागाच्या पूर्णाहुतीनंतर आरती आणि देवीच्या चरणी धार्मिक विधीत झालेल्या ज्ञात-अज्ञात चुकांविषयी पुरोहित, यजमान आणि ग्रामस्थ यांनी क्षमा मागितली.

ओमळी येथे १५ दिवसांच्या शौर्य जागृती वर्गाचा समारोप

हनुमान जयंतीला झालेल्या गदापूजन उपक्रमात शौर्य जागृती वर्गाची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार ५ मेपासून सलग १५ दिवसांचा शौर्य जागृती वर्ग घेण्यात आला.

रत्नागिरी येथील सनातनचे साधक प्रमोद भडकमकर एस्.आर्.टी. कृषी सन्मान विशेष पुरस्काराने सन्मानित

मागील १० वर्षे सातत्याने एस्.आर्.टी. पद्धतीने भडकमकर कुटुंबीय लागवड करतात. भातासह नाचणी, वरी, पावटे, कुळीथ आदी पिके ते घेत आहेत. या पद्धतीमुळे जमिनीची धूप थांबते आणि सुपीकताही वाढते.

Most Wanted Maoist Karnataka Employee : ७ पोलिसांची हत्या करणारा माओवादी निघाला बेंगळुरू महानगरपालिकेचा कर्मचारी !

अशा माओवाद्याविषयी पोलिसांना माहिती न मिळणे आणि तो १९ वर्षे हाती न लागणे, हे कर्नाटक पोलिसांसाठी लज्जास्पद ! कुख्यात माओवादी एवढी वर्षे महानगरपालिकेत कार्यरत होता, ही गोष्ट त्याहून गंभीर आहे. यामागे कोणत्या प्रशासकीय अधिकार्‍यांचे हात आहेत का ?, याचेही अन्वेषण झाले पाहिजे !

‘ईव्हीएम्’ यंत्राशी छेडछाडीचे जुने व्हिडिओ प्रसारित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न !

मतदानप्रक्रिया बाधित करण्यात येत असल्याचे आणि ‘ईव्हीएम्’ यंत्राशी छेडछाड करण्यात येत असल्याचे राज्याबाहेरील जुने व्हिडिओ समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.

थोडक्यात पण महत्वाचे : २७ मे या दिवशी इयत्ता १० वीचा निकाल !….,२ दिवसांनंतरही मानवी अवयव सापडत आहेत ….

२७ मे या दिवशी इयत्ता १० वीचा निकाल ! पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सोमवारी, म्हणजेच २७ मे या दिवशी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल घोषित केला जाणार असल्याचे परिपत्रकाद्वारे घोषित केले. पुढील लिंकवर निकाल … Read more

मावळ (जि. पुणे) येथे ३०० ग्राहकांची बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक !

बांधकाम व्यावसायिकांनी गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण न करणे, ग्राहकांचे पैसे अडकवून ठेवणे असे अनेक प्रकार होतात. याविषयी बांधकाम व्यावसायिकांवर वचक बसवण्यासाठी प्रशासन काय करणार ?