राजकोट (गुजरात) – येथील ‘टी.आर्.पी. गेमिंग झोन’ भागात २५ मेच्या दुपारी लागलेल्या भीषण आगीत १२ लहान मुलांसह २८ जणांचा मृत्यू झाला. येथे मुले खेळत असतांना आग लागली. आग लागल्यानंतर येथून २५ जणांना बाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत अनेक मुलांसह काही लोक जिवंत जळाले.
या प्रकरणात ‘गेमिंग झोन’चा मालक आणि तेथील व्यवस्थापक यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मालकाने ‘गेमिंग झोन’ चालवण्यासाठी अग्नीशमन दलाची अनुमती घेतली नव्हती. राजकोटचे जिल्हाधिकारी प्रभव जोशी यांनी बाहेरच्या उच्च तापमानामुळे ‘गेमिंग झोन’मधील वातानुकूलित यंत्रणेच्या वायरिंगवर अतिरिक्त ताण पडल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.