मुंबई – मतदानप्रक्रिया बाधित करण्यात येत असल्याचे आणि ‘ईव्हीएम्’ यंत्राशी छेडछाड करण्यात येत असल्याचे राज्याबाहेरील जुने व्हिडिओ समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. या व्हिडिआेचा महाराष्ट्रातील लोकसभेच्या चालू सार्वत्रिक निवडणुकीशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्रातील मतदानप्रक्रिया पूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झाली आहे, असे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.