गुप्त धन सापडल्याचा बनाव करून खोटे सोने विकणार्‍या मुसलमानाला अटक !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – ‘शेतात गुप्त धन सापडले आहे’, असे सांगून मुंबईतील व्यावसायिकाला खोटे सोने विकून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शफीकूल इस्लाम या आरोपीला सांताक्रूझ पोलिसांनी आसाम येथे अटक केली आहे. न्यायालयाने शफीकूल याला २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

सांताक्रूझ येथील एका व्यावसायिकाकडे कामगार म्हणून काम करणारा राजूअली कुदूसअली डिसेंबर २०२३ मध्ये नोकरी सोडून आसाम येथे त्याच्या मूळ घरी गेला. गावाला गेल्यावर शेतात गुप्त धन सापडल्याचे सांगून त्यांची विक्री करायचे असलल्याचे राजूअली याने या व्यावसायिकाला दूरभाषद्वारे सांगितले. ११ डिसेंबर २०२३ या दिवशी राजूअली त्याच्या मित्रांसह कोलकाता येथे व्यावसायिकाला भेटून सोन्याचा काही भाग विकला. व्यावसायिकाने सोने खरे असल्याची निश्चिती करून २२ लाख रुपयाला सर्व सोने विकत घेतले; मात्र मुंबईमध्ये आल्यावर सोने खोटे असल्याचे व्यावसायिकाला आढळून आले. या प्रकरणी राजूअली याचा मित्र शफीकूल इस्लाम पोलिसांना सापडला असून त्याला अटक केली आहे. पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका :

विविध क्लृप्त्या काढून जनतेला फसवणारे धर्मांध गुन्हेगार !