कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

प्रवचनाला उपस्थित भाविक

कोची (केरळ) – येथील दत्त-हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी प्रवचन घेण्यात आले. या वेळी सनातनच्या साधिका कु. प्रणिता सुखटणकर यांनी हनुमान जयंतीचे महत्त्व, हनुमानाचा नामजप, हनुमान आणि दत्त या देवतांची दैवी वैशिष्ट्ये, दत्ताचा नामजप कसा करावा ? पितृदोष आणि श्राद्धविधी यांविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. प्रवचन झाल्यावर उपस्थित जिज्ञासूंनी दत्ताच्या नामजपाविषयी सविस्तर जाणून घेतले.