आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुखपदी ३ जणांची निवड !

देहू (जिल्हा पुणे) – जगद‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३९ वा आषाढी वारी पालखी सोहळा २८ जून २०२४ या दिवशी आणि प्रस्थान दुपारी २ वाजता पार पडणार आहे. या आषाढी पायी वारीसाठी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थानच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख म्हणून ह.भ.प. विशाल मोरे, ह.भ.प. माणिक गोविंद मोरे, ह.भ.प. संतोष मोरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. या वेळी संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. संजय महाराज मोरे, ह.भ.प. अजित महाराज मोरे, ह.भ.प. भानुदास महाराज मोरे उपस्थित होते.