शिखर बँकेतील कथित घोटाळ्याची चौकशी बंद करण्याची मुंबई पोलिसांची मागणी !

मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत कोणत्याही प्रकारे अनियमितता नाही. त्यामुळे बँकेतील कथित घोटाळ्याचे अन्वेषण बंद करावे, अशी विनंती राज्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष न्यायालयाकडे केली आहे.

यापूर्वी जानेवारी महिन्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचे अन्वेषण बंद करण्यासाठीचा अहवाल (क्लोजर रिर्पाेट) न्यायालयाला सादर केला होता; मात्र न्यायालयाने तो अद्याप स्वीकारला नाही. वर्ष २००७-२०१७ या कालावधीत शिखर बँकेतून २५ सहस्र रुपये सुतगिरण्या आणि सहकारी साखर कारखाने यांचे मालक यांना नियमबाह्य वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकेचे संचालक अजित पवार यांसह ७० जणांचे नाव आरोपपत्रात आहे.