भाजपच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामचंद्र यांच्याविषयी अवमानकारक व्यक्तव्य केल्याविषयी निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी आव्हाड यांच्या चित्रास कोल्हापुरी चपलेने मारण्यात आले.

सरकार टिकल्यास मंत्रालयसुद्धा गुजरातमध्ये नेतील ! – आदित्य ठाकरे, आमदार

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘उद्याचा निर्णय घटनेनुसार असेल अशी आशा आहे आणि आम्ही सत्याच्या बाजूने असल्याने विजय आमचाच होणार आहे. आता ‘ईडी’, ‘सीबीआय’ यांची भीती वाटत नाही

कोल्हापूर-सांगली पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेची संमती !

३ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पास २ सहस्र ३२८ कोटी रुपये जागतिक बँक देणार !

पुणे येथील कीर्तन महोत्सवातील व्यासपिठावर श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती !

मावळ तालुक्यातील विठ्ठल परिवार मावळ आणि आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

नवी मुंबईत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी !

भगवान श्रीराम यांच्या आहाराविषयी विकृत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी नवी मुंबई विश्व हिंदु परिषदेच्या वतीने सीबीडी पोलीस ठाण्यात बेलापूर प्रखंड मंत्री स्वरूप पाटील यांनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेची शताब्दी ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ या अजरामर गीताने साजरी !

पुणे येथील येरवडा कारागृहासमोर समूहगायन !

विधानसभा अध्यक्षांची मुख्यमंत्र्यांशी भेट म्हणजे न्यायमूर्तींनी आरोपीला भेटणे होय ! – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील, तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची ? यांची मिलिभगत आहे का ?

अमित ठाकरे यांच्याकडून मला जिवे मारण्याचा प्रयत्न ! – महेश जाधव, माथाडी नेते यांचा आरोप

२० वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्याला तुम्ही अशा पद्धतीने वागवता. केवळ पैशासाठी काम करणारी ही संघटना आहे, असा आरोप मनसेचे माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ‘ईडी’ची धाड !

जुलै २०२१ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ‘जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचे पंचतारांकित हॉटेल बांधले’, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

दहिसरमधील (जिल्हा ठाणे) धोकादायक इराणी मशिदीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून पाडून टाका !

ठाणे जिल्ह्यात बांधण्यात येणार्‍या या आशिया खंडातील सर्वात मोठ्या इराणी मशिदीच्या कामाला अनेक ठिकाणांहून आर्थिक पुरवठा झाला; मात्र कै. आनंद दिघे यांच्या प्रखर विरोधानंतर या कामाला वर्ष १९९५ मध्ये ९९ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.