खारघर – मनसेचे अमित ठाकरे आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून मला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. माझ्या जिवाला धोका आहे. उद्या मला काही झाले, तर अमित आणि राज ठाकरे हे उत्तरदायी असतील. ८०० कामगारांचा प्रश्न आहे. कुठल्यातरी कंत्राटदाराने सांगितले म्हणून एक विषय सोडून द्या, असे मला सांगण्यात आले. मला ‘राजगड’ला बोलावल्यावर मी काही कामगारांना घेऊन गेलो. तिथे अमित ठाकरे यांच्या केबिनमध्ये त्यांच्याशी बोलतांना ते चिडले आणि त्यांनी हातातील वस्तू घेऊन मला मारले, त्यामुळे मला ७ टाके पडले. केबिनपासून राजगडच्या खालपर्यंत मला मारत आणण्यात आले. २० वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्याला तुम्ही अशा पद्धतीने वागवता. केवळ पैशासाठी काम करणारी ही संघटना आहे, असा आरोप मनसेचे माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी केला आहे.
‘राज ठाकरे दलाल, अमित खंडणीखोर, पक्ष वसुली बहाद्दर…’ मनसे नेत्याच्या आरोपानंतर नवी मुंबईत काय घडलं? https://t.co/3tKRdaztmL#mns #rajthackeray
— Mumbai Tak (@mumbaitak) January 9, 2024
यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, कामगारांच्या फसवणुकीच्या तक्रारी येत होत्या. ते अमित ठाकरे यांच्या केबीनमध्ये उलट-सुलट बोलल्याने मनसे कार्यकर्त्यांनीच त्यांना मारले, असे मला समजले. तुम्ही २० वर्षे आहात, तेव्हा ही संघटना कशी आहे, ते कळले नाही का ? इतकी वर्षे ते अमित ठाकरे यांच्याकडे येऊन कामगारांचे प्रश्न सोडवून घेत होते.