सौ. निवेदिता उपासनी (पू. (कै.) दत्तात्रेय देशपांडे यांची मुलगी) देवद आश्रमात आल्या असतांना त्यांचा हरवलेला सोन्याचा अलंकार त्यांना १० दिवसांनी तेथे परत आल्यावर मिळाल्याने त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

आश्रमातील वातावरण प्रसन्न होते. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा, तसेच शिस्त या सर्व गोष्टी तेथे प्रकर्षाने जाणवत होत्या. त्याचबरोबर मला येथील साधकांमधील प्रामाणिकपणाचा अनुभव प्रत्यक्ष निदर्शनास आला. तो अनुभव मी कथन करते.

प्रेमभाव, नीटनेटकेपणा आणि सतत कृतज्ञताभावात असणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) सुलोचना जाधवआजी (वय ७७ वर्षे) !

मी वैद्य असल्यामुळे गेल्या दोन वर्षांत माझा सौ. सुलोचना जाधवआजींशी अनेकदा संपर्क आला. गुरुदेवांच्या कृपेने त्यांची काही प्रमुख गुणवैशिष्ट्ये  माझ्या लक्षात आली. ती मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.

सनातनचे ११ वे (समष्टी) संत पू. संदीप आळशी यांनी साधकांना साधना आणि सेवा यांसाठी केलेले मार्गदर्शन

श्री गुरूंचे कार्य दैवी आहे. आपण काही केले नाही, तरी ते पूर्णत्वाला जाणारच आहे. त्यामुळे ‘आपण सेवा करतो’, असा कर्तेपणा वाटायला नको.

सत्त्व, रज आणि तम यांचे महत्त्व

‘गुरुदेव, आपण आपले सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण भगवंताकडे लावण्याकरता प्रतिदिनचा नेम लावून घेतला आहे. आपली प्रत्येक क्रिया भगवत्प्राप्तीकरता घडेल, अशी ठेवली. या तिन्ही गुणांचे, म्हणजेच स्वतःतील ३ गुणांचे उदात्तीकरण होते.

प्रेमभाव, समजूतदार असलेला आणि इतरांना तत्परतेने साहाय्य करणारा मिरज येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. राम राघवेंद्र आचार्य (वय १७ वर्षे) !

‘मिरज येथील कु. राम राघवेंद्र आचार्य (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) याची त्याच्या आत्यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. प्रभाकर प्रभुदेसाई यांच्या निधनानंतर घरी आलेले साधक आणि पाहुणे यांना त्यांच्या घरात जाणवलेला पालट !

माझे यजमान श्री. योगेश प्रभुदेसाई यांना वडिलांच्या मृत्यूनंतर ‘पुनःपुन्हा रडू येणे, त्यांची आठवण होणे’, असे विचार येण्यापेक्षा ते ‘बाबांना चांगली गती मिळावी. ते गुरुचरणी रहावेत. त्यांची साधना चालू रहावी’, अशी प्रार्थना करत होते आणि घरातही सर्वांना प्रार्थना करायला सांगत होते.’

साधिकेकडून विविध देवतांना आपोआप होणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थना आणि तिला आलेली अनुभूती

‘आकाशातून पडणारे पावसाचे पाणी ज्याप्रमाणे शेवटी सागरालाच जाऊन मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला, तरी तो त्या केशवाला, म्हणजे परब्रह्मालाच पोचतो.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त काढलेल्या रथोत्सव सोहळ्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत. ते सच्चिदानंद परब्रह्म असून सर्वांची गुरुमाऊली आहे’, हे माझ्या लक्षात आले आणि माझे मन कृतज्ञतेने भरून आले.

२ दंतवैद्यांनी उपचार करूनही दातांच्या संदर्भातील त्रास दूर न होणे; मात्र मंत्रोपचाराने १५ दिवसांतच दातांच्या संदर्भातील त्रास दूर होऊन मंत्रातील सामर्थ्याची प्रचीती येणे

‘हे श्रीकृष्णा आणि प.पू. गुरुमाऊली, मला होत असलेला तीव्र त्रास मंत्रजपामुळे ठीक झाला. आपणच मला ‘मंत्रांमध्ये किती सामर्थ्य असते !’, याची जाणीव करून दिलीत, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’