पुणे येथील कीर्तन महोत्सवातील व्यासपिठावर श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – येथील मावळ तालुक्यातील विठ्ठल परिवार मावळ आणि आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. या कीर्तन महोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागील ६ वर्षांपासून धार्मिक सेवाकार्यात कार्यरत असणार्‍या श्री विठ्ठल परिवार, मावळ यांनी नववर्षाच्या आरंभीलाच भव्य दिव्य स्वरूपात कीर्तनाचे आयोजन केले होते. अयोध्येत प्रभु श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. याच अनुषंगाने कीर्तनस्थळी व्यासपिठावर श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती, तसेच ४५ फूट उंच श्रीरामाचे कटआऊट लावले होते. प्रत्येकालाच अयोध्येला जाऊन श्रीराममंदिराचे दर्शन घेणे शक्य होणार नाही, त्यामुळे कीर्तनातील श्रीराममंदिराचा देखावा पाहून अनेक नागरिकांनी समाधान मानले.