आमदार प्रमोद (राजू) पाटील यांची मागणी
ठाणे, ९ जानेवारी (वार्ता.) – ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आशिया खंडातील सर्वात मोठी इराणी मशीद बांधण्याचे काम वर्ष १९९३ मध्ये चालू करण्यात आले होते. २५० एकर जागेत ही मशीद बांधण्यात येत होती; मात्र तत्कालीन शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख कै. आनंद दिघे यांनी या मशिदीचे काम थांबवले होते. आता ही वास्तू जीर्ण झाली असल्याने तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पाडण्याची मागणी मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली आहे. त्यावर पालकमंत्र्यांनीही तातडीने जिल्हाधिकार्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मशिदीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शीळफाटा-पनवेल मार्गावर असलेल्या इराणच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यात बांधण्यात येणार्या या आशिया खंडातील सर्वात मोठ्या इराणी मशिदीच्या कामाला अनेक ठिकाणांहून आर्थिक पुरवठा झाला; मात्र कै. आनंद दिघे यांच्या प्रखर विरोधानंतर या कामाला वर्ष १९९५ मध्ये ९९ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.