जुनी सर्व कर्मकांडे पालटली, तरी सनातन धर्म बुडणे शक्य नाही ! – स्वातंत्र्यवीर सावरकर
जेव्हा आपण धर्म शब्दास ‘सनातन’ हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्वर, जीव आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र आणि त्यांचे सिद्धांत अन् तत्त्वज्ञान असा असतो.