‘नारायणाच्या रूपाचे स्मरण केल्यास साधना वाढून संत होता येईल’, असे स्वतःच्या बहिणीला सांगणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) !

२४.३.२०२२ या दिवशी कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय ११ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर या बहीण-भावंडामध्ये आध्यात्मिक स्तरावर झालेला संवाद !

पू. वामन राजंदेकर

कु. श्रिया : ‘पू. वामन, मी साधनेचे प्रयत्न कसे करू ?

कु. श्रिया राजंदेकर

पू. वामन : नारायणाच्या रूपाचे स्मरण कर.

कु. श्रिया : तसे केल्याने काय होईल ?

पू. वामन : नामजप वाढेल.

कु. श्रिया : नामजप वाढल्यावर काय होईल ?

पू. वामन : आपली साधना होईल.

कु. श्रिया : साधना वाढल्यावर काय होईल ?

पू. वामन : तुझा नवीन जन्म होईल.

कु. श्रिया : नवीन जन्म म्हणजे काय ?

पू. वामन : नारायण तुला हार घालतील.

कु. श्रिया : म्हणजे काय होईल ?

पू. वामन : आपण नारायणाचे रूप, म्हणजेच संत होऊ !’

– कु. श्रिया राजंदेकर, (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), फोंडा, गोवा. (२४.३.२०२२ )

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.