छत्रपती संभाजीनगर – मुंबई ते जालना ‘वन्दे भारत’ रेल्वे धावणार आहे. या रेल्वेची चाचणी २८ डिसेंबर या दिवशी पार पडली. ही रेल्वे २८ डिसेंबरच्या पहाटे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर पोचली. या वेळी विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी लोको पायलट यांचे स्वागत केले. ३० डिसेंबर या दिवशी या रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सींग’द्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहे.
प्रत्येक राज्यातून ‘वन्दे भारत’ चालवण्याची पंतप्रधान मोदी यांची योजना आहे. सध्या देशभरात ३५ वन्दे भारत रेल्वेगाडीच्या ७० फेर्या होत आहेत. महाराष्ट्रात ५ वन्दे भारत एक्सप्रेस धावत आहेत. ज्यामध्ये एकट्या मध्य रेल्वेवर ४ वन्दे भारत धावत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नांनी ही रेल्वे मराठवाड्यासाठी आली आहे.