भिवंडी येथे ८०० किलो प्लास्टिक जप्त !

प्रतिकात्मक चित्र

ठाणे, २९ डिसेंबर (वार्ता.) – भिवंडी शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेच्या अंतर्गत महानगरपालिकेने बंदी घातलेले ८०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. तसेच संबंधित दुकानदारांकडून ३५ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. भिवंडी शहरात महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांनी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत ‘प्लास्टिकमुक्त भिवंडी’ करण्याचा संकल्प केला आहे.