मुंबई – येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून गुप्तचर विभागाच्या पथकाने ५ कोटी ७७ लाख रुपयांची सिगारेट हस्तगत केली. समुद्रमार्गे ही विदेशी सिगारेट भारतात आणण्यात आली होती. सिगारेटच्या खोक्यांवर चिंच झाकण्यात आली होती. त्यामुळे खोके उघडल्यावरही प्रारंभी सिगारेट दिसली नाही. जप्त केलेल्या तस्करीच्या सिगारेटचे बाजारभावाप्रमाणे मूल्य अनुमाने ५ कोटी ७७ लाख रुपये आहे. यात ३३ लाख ९२ सहस्र सिगारेटच्या काड्यांचा समावेश आहे.