ठाणे येथील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरदकाका वैशंपायन यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

३ डिसेंबर या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका अनौपचारिक भावसोहळ्यात पू. शरदकाका यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी ‘तुमच्या रूपात प्रत्यक्ष योगतज्ञ प.पू. दादाजी आले आहेत’, असे पू. शरद काका यांना भावपूर्ण निवेदन केले.

हिंदूंनी साधना करणे अपरिहार्य !

‘सध्याच्या काळात हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, हे त्यांचे समष्टी प्रारब्ध आहे ! या प्रारब्धावर मात करण्यासाठी सर्व हिंदूंनी साधना करणे, हाच एकमेव उपाय आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे येथे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी १५ शाळांच्या इमारती ‘सील’; २५ सहस्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी !

विद्यार्थ्यांच्या हानीचे दायित्व कुणाकडे ? अशा प्रकारे कर थकित ठेवणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

संपादकीय : गोरखा सैनिकांची व्यथा !

नेपाळ हिंदूबहुल राष्ट्र आहे. ते पूर्वी एकमेव हिंदु राष्ट्र होते आणि आता जरी ते नसले, तरी भविष्यात ते पुन्हा हिंदु राष्ट्र होऊ शकते. हिंदु असलेले नेपाळमधील गोरखा भारतीय सैन्यात कसे टिकून रहातील, या दृष्टीने भारताने विचार करणे आवश्यक !

मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोणावळा (पुणे) येथील इतर भाषिक पाट्या हटवल्या !

येथील मराठी पाट्या नसणार्‍या दुकानांवर ४ डिसेंबर या दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चा नेला आणि इतर भाषिक पाट्या काढून टाकल्या. सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत दिलेली मुदत संपल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.

आम्हीही देवाच्या आणि धर्माच्या नावाने मते मागू ! – उद्धव ठाकरे

मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते की, निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने मते मागितली तर तो गुन्हा होतो का ? निवडणूक आयोगाने माझ्या पत्रास उत्तर दिले नाही.

‘मित्र’ संस्थेला कार्यालयासाठी महागडी जागा आणि अधिकार्‍यांना गाडी अन् बंगला देण्याच्या संदर्भात विरोधकांकडून प्रश्न उपस्थित !

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासाठी १५ लाख रुपयांची कार खरेदी करण्याचा ठराव सरकारने संमत केला आहे.

(म्हणे) ‘भागवत धर्माला पर्याय देण्यासाठी परराज्यातील बाबांना बोलावले !’ – रोहित पवार

वारकरी संप्रदाय पुरोगामी कधीच नव्हता आणि नाही. हिंदु धर्म व्यापक आहे. धर्मातही राजकारण पहाणारे नेते !