लोणावळा (जिल्हा पुणे) – येथील मराठी पाट्या नसणार्या दुकानांवर ४ डिसेंबर या दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चा नेला आणि इतर भाषिक पाट्या काढून टाकल्या. सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत दिलेली मुदत संपल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर इतर भाषिक पाट्या लावणार्या दुकान मालकांना नोटिसा धाडू, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे ‘उर्वरित पाट्या दुकान मालकांनी स्वतःहून काढून घेतल्या नाहीत अथवा प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही, तर त्या पाट्या मनसे पद्धतीने हटवल्या जातील’, अशी चेतावणी मनसेकडून देण्यात आली आहे.