37th National Games : खेळाडूंसाठी सर्व सरकारी खात्यांमध्ये ४ टक्के आरक्षण ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्याची ओळख पूर्वी केवळ पर्यटनासाठी होती आणि आता क्रीडा स्पर्धेसाठी गोवा ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे गोव्यात साधनसुविधांसमवेतच मानवी संसाधनही निर्माण झाले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा गोव्याला झालेला हा लाभ आहे.

आडेली (वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) येथे रेशन दुकानात निकृष्ट धान्य : पुरवठादारावर कारवाईची मागणी

धान्य दुकानावर धान्य वितरण चालू असतांना तांदुळाच्या पोत्यामध्ये ‘प्लास्टिक’ पिशवीत लालसर रंगाचे ‘चायनीज’ सदृश पदार्थ असल्याचे निदर्शनास आले, तसेच तांदुळाच्या पोत्यामध्ये किडे आणि अळ्या सापडल्या, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तळवडेत (राजापूर ) ऊस गाळप हंगामाचा आरंभ

उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांनी त्यांच्या विविध उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून दिली आहे. एक मराठी उद्योजक म्हणून त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

37th National Games : गोव्याने ९२ पदके मिळवून इतिहास रचला !

३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : २७ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३८ कांस्य पदके मिळून एकूण ९२ पदके मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत यजमान गोव्याने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यामुळे स्पर्धेतील राज्यांच्या सूचीमध्ये गोवा ९ व्या स्थानावर पोचला !

 रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘चक्रीवादळ आपत्ती निवारण’ रंगीत तालीम

गावांमधून चेतावणी  देवून सतर्क करणे, साधनसामुग्रीच्या साहाय्याने घायाळांना वाचवणे, घायाळांना रुग्णवाहिकेपर्यंत नेणे, किनार्‍यावर आणणे आदी प्रात्यक्षिके रंगीत तालिमेत सादर केली.

रत्नागिरी येथे कोकण रेल्वे कर्मचार्‍यांकरता झाली ‘Posh Act 2013’ कायद्याविषयी जनजागृती कार्यशाळा

कोकण रेल्वे कर्मचार्‍यांकरता  Posh Act 2013 ‘स्त्रियांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध कायदा २०१३’ या विषयावर कार्यशाळा झाली.

आज ‘कोल्‍हापूर हायकर्स’च्‍या वतीने पन्‍हाळगडावर ‘दीपोत्‍सव’ !

‘कोल्‍हापूर हायकर्स’च्‍या वतीने शुक्रवार, १० नोव्‍हेंबरला पन्‍हाळगडावर ‘दीपोत्‍सव’ होत आहे. गेली ११ वर्षे हा उपक्रम चालू असून तो सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत श्री शिवछत्रपती मंदिर ते महाराणी ताराराणी राजवाड्यापर्यंत दीप लावून साजरा केला जाणार आहे.

स्वार्थी आणि आत्मकेंद्रित भारतीय जनता !

‘भारतीय जनता स्वार्थी आणि आत्मकेंद्रित झाल्यामुळे तिला राष्ट्र अन्‌ धर्म यांच्याबद्दल प्रेम नाही. त्यामुळे अशा या जनतेने राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल मनात काहीच जाणीव नसणार्‍या उमेदवाराला निवडून दिले, तर यात आश्चर्य ते काय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले