
कोल्हापूर – ‘कोल्हापूर हायकर्स’च्या वतीने शुक्रवार, १० नोव्हेंबरला पन्हाळगडावर ‘दीपोत्सव’ होत आहे. गेली ११ वर्षे हा उपक्रम चालू असून तो सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत श्री शिवछत्रपती मंदिर ते महाराणी ताराराणी राजवाड्यापर्यंत दीप लावून साजरा केला जाणार आहे. ‘या उपक्रमास सर्व करवीरवासीय आणि महाराष्ट्रातील गडप्रेमी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा’, असे आवाहन अध्यक्ष सागर श्रीकांत पाटील यांनी केले आहे.
या दीपोत्सव कालावधीत ‘शंभूराजे अकॅडमी’ यांची शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके होणार आहेत. शिवप्रेमींनी त्याच्या समवेत फटाके आणू नयेत, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे