रत्नागिरी येथे कोकण रेल्वे कर्मचार्‍यांकरता झाली ‘Posh Act 2013’ कायद्याविषयी जनजागृती कार्यशाळा

रत्नागिरी, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – कोकण रेल्वे कर्मचार्‍यांकरता कोकण रेल्वे कर्मचारी जागरुकता कार्यक्रमाच्या अंतर्गत येथील ‘सह्याद्री स्टाफ क्लब’मध्ये सकाळी ९.३० ते ११ या वेळेत कामाच्या ठिकाणी Posh Act 2013 (कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध कायदा २०१३) ‘स्त्रियांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध कायदा २०१३’ या विषयावर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचा प्रारंभ प्रमुख अतिथींच्या स्वागताने झाला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. ए.जी. गोसावी, मुख्य न्यायिक दंडाधिकारी श्री. आर्. एम्. चौथरे आणि विशेष सरकारी अधिवक्त्या (सौ.) मेघना सुहास नलावडे उपस्थित होत्या.

या कार्यशाळेच्या प्रारंभी क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक यांनी कार्यशाळेचा उद्देश आणि माहिती दिली. या वेळी कोकण रेल्वेचे अन्य वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. या वेळी ‘कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध कायदा २०१३’ याविषयी मान्यवरांनी उपस्थितांना माहिती दिली. तसेच विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायद्यांची थोडक्यात माहिती देणारी पुस्तिका उपस्थितांना देण्यात आली या वेळी रेल्वे पोलीस अधिकारी श्री. धोत्रे, श्री. मुधाळ आणि श्रीमती साळुंखे उपस्थित होते.