सावरकरांच्या शिकवणीप्रमाणे अखंड सावधान रहा ! – तेजस्वी सूर्या, खासदार, भाजप
भाजप सत्तेतून गेल्याचे असे अनेक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शिकवणीप्रमाणे आपण ‘अखंड सावधान’ असणे आवश्यक आहे, असे आवाहन भाजपच्या युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. तेजस्वी सूर्या यांनी केले.
माजी आमदार नितीन शिंदे यांच्याकडून अफझलखानवधाच्या शिल्पाची पहाणी !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगड येथे अफलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केला. हा पराक्रम लवकरच शिल्परूपातून शिवभक्तांसमोर येणार असून याचे काम पुणे येथे चालू आहे.
जम्मू-काश्मीर येथून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करणारे २ धर्मांध अटकेत !
जम्मू-काश्मीर येथील मुदस्सीर हुसेन महंमद हुसेन (वय १९ वर्षे) आणि यासीर हुसेन मोहम्मद यासीन (वय १९ वर्षे) यांनी तेथील १५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी तरुणांना अटक केली आहे.
तणावमुक्तीसाठी भगवंताचे नामस्मरण करायला हवे ! – पुरुषोत्तम महाराज पाटील, कीर्तनकार
‘रामकृष्णहरि’ नामस्मरण. हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. यातील रामाचा विचार, कृष्णाचा आचार आणि हरीचा उच्चार करा, त्यामुळे तणावातून मुक्तता मिळेल. त्यासाठी श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण करायला हवे, अशी भावना आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी व्यक्त केली.
सांगली जिल्ह्याला पाणी देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीजपुरवठा केला खंडीत !
सांगली जिल्ह्याला पाणी देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही गावांतील वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. अल्प पावसामुळे सातारा जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
भटक्या कुत्र्यांचा त्रास !
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई मनपाचे आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांना मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रकाश टाकणारे पत्र लिहिले आहे.