पुणे – अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील याने ससूनमधून पलायन केले होते. या प्रकरणी राज्य सरकारने ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’च्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना १० नोव्हेंबर या दिवशी पदमुक्त केले होते, तसेच अस्थिव्यंगोपचार विभागातील पथकप्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांनाही राज्य सरकारने निलंबित केले. अधिष्ठाता पद रिक्त झाल्याने आधीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना पुनर्नियुक्तीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार डॉ. काळे यांनी त्वरित अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
#shorts डॉ.विनायक काळेंनी स्वीकारला ससून रुग्णालयाचा पदभार #shortsfeedhttps://t.co/2bfE2uXJ8H#lokshahimarathi #vinayakkale #sassoon #sassoonhospital #pune
— Lokshahi Marathi (@LokshahiMarathi) November 13, 2023
ललित पाटील पलायन प्रकरणी राज्य सरकारने एक समिती गठित केली होती. या समितीने डॉ. ठाकूर यांच्यासह इतर अधिकार्यांना दोषी धरले आहे. त्यांच्यावर प्राथमिक कारवाई करून खात्यांतर्गत अन्वेषण चालू केले आहे. यात इतरही अधिकार्यांवर कारवाई होईल, असे समितीचे म्हणणे आहे.