फातोर्डा (गोवा) येथे ईदच्या मिरवणुकीत हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने : पोलिसांकडून गुन्हा नोंद

हिंदूंनी केवळ गुन्हा नोंद झाल्याविषयी समाधान न मानता संबंधितांना अटक होऊन न्यायालय त्यांना दोषी ठरवेपर्यंत पाठपुरावा घ्यावा ! अशी प्रकरणे कालांतराने मिटवली जाण्याचीही शक्यता असते !

गोव्यातील व्याघ्रक्षेत्राचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या निकालावर अवलंबून ! – महाधिवक्ता पांगम

उच्च न्यायालयाने गोवा सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंत समयमर्यादा दिली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तसेच, वनात रहाणार्‍या लोकांच्या अधिकारासंबंधी विचार ही कारणे देऊन ही मुदतवाढ मागता येईल.

अध्यात्मप्रसार करतांना पुढील गोष्ट लक्षात ठेवा !

‘देवाचे अस्तित्वच न मानणारे कधी ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करण्याचा विचार करू शकतील का ? साधकांनी अध्यात्मप्रसार करतांना अशांशी बोलण्यात वेळ वाया घालवू नये !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये मिळणार विनामूल्य रोजगार प्रशिक्षण !

महाराष्ट्रातील ५११ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्रे चालू करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये शिवणकाम, वेष्टन करणे यांसह इलेक्ट्रिकल्स कोर्स, पंप दुरुस्ती, बांधकाम आदी विविध रोजगार प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चा २३ लाख नागरिकांकडून लाभ !

‘आपला दवाखाना’मध्ये विनामूल्य वैद्यकीय पडताळणी, औषधोपचार यांसह रक्त चाचण्यांची सेवा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विशेष तज्ञांच्या सेवाही पॉलीक्लिनिक आणि डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

राज्यातील गडदुर्ग, प्राचीन वास्तू, लेणी, शिलालेख यांचे खासगी संस्थांना संवर्धन करता येणार !

यापुढे प्राचीन स्मारके पहाण्यासाठी द्यावे लागणार शुल्क !

‘कॉफी शॉप’मध्ये अश्लील धंदे !

सिन्नर (नाशिक) येथील एका ‘कॉफी शॉप’मध्ये अनैतिक धंदे चालू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड घातली. येथे ५० ते ६० गर्भनिरोधक आढळून आले. येथे अल्पवयीन मुलींसमवेत अश्लील चाळे करण्यासह अत्याचाराच्याही घटना घडल्या आहेत.

समलैंगिकतेला बांध ?

‘समलैंगिकता हा आजार आहे’, हे प्रथम स्वीकारले पाहिजे, तर मग त्यातून बाहेर पडण्याचे उपचार मिळणे अशक्य नाही. निसर्ग आणि भारतीय संस्कृती यांच्या विरोधातील समलैंगिक संबंधांतून बाहेर पडण्यासाठी योग्य उपचार घेणे आवश्यक !

रेल्वेची विनातिकीट प्रवाशांवर कारवाई !

विनातिकीट प्रवास करणार्‍या ४ सहस्र ४३८ प्रवाशांवर १६ ऑक्टोबर या दिवशी मध्य रेल्वेने कारवाई केली. त्यांच्याकडून १६ लाख ८५ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे.