‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे पार पडला !

गरवारे महाविद्यालयाच्‍या जवळील ‘कोहिनूर मंगल कार्यालय’, कर्वे रोड येथे ८ ऑक्‍टोबर या दिवशी डॉ. अमित थढानी यांनी लिहिलेल्‍या ‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ या पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

सनातन धर्म नष्‍ट करण्‍याची भाषा करणार्‍यांच्‍या मनात सनातनी हिंदूंचा वंशविच्‍छेद हेच ध्‍येय ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

महाराष्‍ट्रातील सनातनधर्मीय हिंदु समाजाने सजग होण्‍याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍यांचा प्रतिवाद करण्‍याची आवश्‍यकता आहे, असे आवाहन सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

अटक केलेल्‍या निष्‍पाप हिंदु तरुणांवरील गुन्‍हे मागे घेण्‍यात यावेत !

हिंदु देवतांची पोस्‍ट सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करणार्‍या मुसलमान युवकाचे अन्‍वेषण करावे, अटक केलेल्‍या निष्‍पाप हिंदु तरुणांवरील गुन्‍हे मागे घेण्‍यात यावेत, या तसेच विविध मागण्‍यांसाठी सकल हिंदु समाज सांगली जिल्‍ह्याच्‍या वतीने ‘आक्रोश हिंदू संयमाचा’ या नावाने धरणे आंदोलन करण्‍यात आले.

मालेगाव न्‍यायालयात खासदार संजय राऊत यांच्‍यावर अब्रूहानीचा खटला प्रविष्‍ट !

‘वृत्तपत्रातून चुकीची आणि अपर्कीतीकारक माहिती प्रसिद्ध करण्‍यात आली आहे’, असा आरोप करत मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्‍यावर मालेगाव येथील अतिरिक्‍त मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी यांच्‍या न्‍यायालयात अब्रूहानीचा खटला प्रविष्‍ट केला आहे.

अनधिकृतपणे वास्‍तव्‍य करणार्‍या १४ जणांना भारत सोडण्‍याची नोटीस

पोलिसांनी अमली पदार्थ बाळगणार्‍यांच्‍या विरुद्धच्‍या मोहिमेमध्‍ये उलवे येथे रहाणार्‍या नायजेरियन नागरिकांवर कारवाई केली आहे. यामध्‍ये अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या १४ जणांना भारत सोडण्‍याची नोटीस बजावली आहे.

घाटकोपर येथील गुजराती भाषेतील फलक तोडला !

मराठीबहुल महाराष्‍ट्रात सर्वच फलक किंवा नावांच्‍या पाट्या मराठीत असायला हव्‍यात !

प्रतापगड (सातारा) येथे आज शूरवीर जिवाजी महाले यांचा जयंती उत्‍सव !

शूरवीर जिवाजी महाले यांचा जयंती उत्‍सव ९ ऑक्‍टोबर या दिवशी प्रतापगड (सातारा) येथे साजरा होणार आहे, अशी माहिती ‘स्‍वाभिमानी नाभिक संघटने’चे राज्‍याध्‍यक्ष शंकरराव गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

नागपूर येथील कु. आदिनाथ देशपांडे याचा राष्‍ट्रीय स्‍तरावरील पाठांतर स्‍पर्धेत द्वितीय क्रमांक !

मुंबई येथील अभिनेत्री, लेखिका आणि यूट्यूबर अनुराधा राजाध्‍यक्ष यांनी ऑगस्‍ट २०२३ मध्‍ये आयोजित केलेल्‍या ‘ऑनलाईन’ राष्‍ट्रीय स्‍तरावरील ‘मनाचे श्‍लोक पाठांतर स्‍पर्धे’त सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ अंकुश देशपांडे (वय ८ वर्षे (इयत्ता तिसरी)) याने सहभाग घेतला होता.

इस्रायल-हमास युद्ध !

हमासच्‍या आतंकवादी आक्रमणातून भारताने शिकून पाकच्‍या आतंकवादाचा त्‍याच्‍या भूमीत शिरून अंत करावा, ही अपेक्षा !

परभणी येथे बालविवाह करून अत्‍याचार करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद !

परभणी येथील एका १५ वर्षांच्‍या मुलीशी विवाह करून तिच्‍यावर अत्‍याचार केल्‍याची घटना १७ सप्‍टेंबर या दिवशी शहरात घडली होती. या प्रकरणी तिच्‍या पतीविरुद्ध अत्‍याचार आणि बाललैंगिक अत्‍याचार (पोक्‍सो) कायद्यानुसार गुन्‍हा नोंद करण्‍यात आला.