अटक केलेल्‍या निष्‍पाप हिंदु तरुणांवरील गुन्‍हे मागे घेण्‍यात यावेत !

  • सातारा जिल्‍ह्यातील पुसेसावळी येथील दंगलीचे प्रकरण !

  • सकल हिंदु समाजाचे धरणे आंदोलन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे आंदोलन करणारे हिंदुत्‍वनिष्‍ठ

सांगली – सातारा जिल्‍ह्यातील पुसेसावळी येथे झालेल्‍या दंगलीतील पोस्‍ट सामाजिक माध्‍यमांवर  प्रसारित करणार्‍या आणि दंगलीला उत्तरदायी असणार्‍या युवकावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद करावा, हिंदु देवतांची पोस्‍ट सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करणार्‍या मुसलमान युवकाचे अन्‍वेषण करावे, अटक केलेल्‍या निष्‍पाप हिंदु तरुणांवरील गुन्‍हे मागे घेण्‍यात यावेत, या तसेच विविध मागण्‍यांसाठी सांगलीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे सकल हिंदु समाज सांगली जिल्‍ह्याच्‍या वतीने ‘आक्रोश हिंदू संयमाचा’ या नावाने धरणे आंदोलन करण्‍यात आले. (असे आंदोलन का करावे लागते ? – संपादक)

या प्रसंगी माजी आमदार श्री. नितीन शिंदे म्‍हणाले, ‘‘या दंगलीस कट्टरपंथीय मुसलमान समाजच उत्तरदायी आहे. राज्‍यात हिंदुत्‍वनिष्‍ठ विचारांचे सरकार आल्‍यानंतर मुसलमान समाजाच्‍या तरुणांकडून विविध शहरांमध्‍ये जाणीवपूर्वक देवतांविषयी आक्षेपार्ह ‘पोस्‍ट’ प्रसारित केल्‍या जात आहेत. औरंगजेब, टिपू सुलतान यांची चित्रे मिरवणुकांमध्‍ये नाचवली जात आहेत. हे सर्व दंगली घडवण्‍याचा कट असल्‍यासारखे वाटते. त्‍यामुळे उत्तरप्रदेश येथील सरकारप्रमाणे राज्‍यातील सरकारने आक्षेपार्ह पोस्‍ट प्रसारित करणार्‍यांची घरे भूईसपाट करावीत.’’

या प्रसंगी भाजपचे श्री. श्रीकांत तात्‍या शिंदे, शिवसेना जिल्‍हाध्‍यक्ष श्री. महेंद्र चंडाळे, हिंदु एकताचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. विष्‍णुपंत पाटील, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. बाळासाहेब मोहिते-पाटील यांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले. या प्रसंगी सर्वश्री परशुराम चोरगे, राम काळे, हरिदास कालिदास, सुहास जोशी, योगेश गाडगीळ, प्रकाश निकम, आशिष साळुंखे, भाजपचे श्रीकांत वाघमोडे, अजय वाले, धनंजय खाडीलकर यांसह शिवभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.