पालघर येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना ३ जणांचा बुडून मृत्‍यू !

वाडा तालुक्‍यातील कोणसई गावात ओहळावर आस्‍थापनातील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना जगन मौर्य (वय ३८ वर्षे) आणि सुरज प्रजापति (वय २५ वर्षे) या परप्रांतियांचा बुडून मृत्‍यू झाला.

श्री गणेशमूर्तीदान मोहिमेस सक्‍ती करू नका !

पन्‍हाळा तालुक्‍यातील कोडोली ग्रामपंचायत कार्यालयात श्री गणेशमूर्तीदान मोहिमेस सक्‍ती करू नये; म्‍हणून ग्रामसेवक श्री. जयवंत विष्‍णु चव्‍हाण आणि श्री. प्रकाश पाटील यांना निवेदन देण्‍यात आले.

पनवेलमधील लेडीज बारवर धाड

पनवेल तालुका पोलिसांनी स्‍वतःच्‍या हद्दीतील २ लेडीज बारवर नुकतीच धाड टाकून ३४ महिला, तसेच २३ अन्‍य लोक, तसेच व्‍यवस्‍थापक, नोकर आणि ग्राहक अशा ५७ व्‍यक्‍तींना कह्यात घेतले.

हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांचे शास्‍त्रानुसार पंचगंगा नदीत दीड दिवसांच्‍या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

यंदा प्रशासनाने नदीकाठी छोटी कृत्रिम कुंड बसवली होती, तसेच मूर्तीदान ऐच्छिक ठेवले होते. भाविकांनी मात्र पंचगंगा नदीत विसर्जन करण्‍यासच पसंती दर्शवली. मूर्तीदानही अत्‍यल्‍प प्रमाणात झाले.

मुंबईत लोकलमध्ये अश्‍लील नृत्‍य करणार्‍या तरुणीच्‍या व्‍हिडिओवर मुंबईकर संतापले

लोकलमध्ये एका तरुणीचा ‘बेली डान्‍स’ नावाचा अश्‍लील नृत्‍यप्रकार करतांनाचा व्‍हिडिओ प्रसारित होत आहे. प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी तरुण-तरुणी अशा प्रकारच्‍या गोष्‍टी हल्ली मोठ्या प्रमाणात करतात; परंतु या व्‍हिडिओवर मुंबईकरांनी जोरदार संतप्‍त प्रतिक्रिया दिल्‍या आहेत.

धनगर आरक्षणासाठी पुणे-सातारा महामार्ग १ घंटा रोखून धरला !

खंडाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आंदोलनाला प्रारंभ करण्‍यात आला. नंतर मोर्चा काढत धनगर समाज बांधव महामार्गावरती एकत्र आले आणि महामार्ग रोखून धरला.

पिंपरी-चिंचवड विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्‍णवाहिका सज्‍ज !

शास्‍त्राप्रमाणे वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन हे पर्यावरणपूरकच आहे.

कृत्रिम हौदात गढूळ पाणी आणि कचरा असल्‍याने श्री गणेशमूर्ती घेऊन घरी परतण्‍याची भाविकांवर वेळ !

महापालिका प्रशासन आणखी किती वेळा अशा पद्धतीने गणेशाचा अवमान करणार आहे ? याविषयी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍यावर कठोर कारवाई करायला हवी. नदीला मुबलक पाणी असल्‍याने वहात्‍या पाण्‍यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले, तर शास्‍त्राला धरून कृती होईल.

मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधून तेथेच विसर्जन करण्‍याचा अट्टहास !

धर्मशास्‍त्राप्रमाणे वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे हे योग्‍य असतांना कृत्रिम हौद आणि मूर्तीदान मोहीम राबवून महापालिका अन् काही स्‍वयंसेवी संघटना धर्मद्रोही कृत्‍य करत आहेत. याला भक्‍तांनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करावा.

वास्तविक रंगभूषा (मेक-अप) !

‘बाहेरची रंगभूषा (मेक-अप) इतरांना आकर्षित करते, तर आतील रंगभूषा (मेक-अप), म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून देवाला आकर्षित करते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले