साधना करतांना पुणे येथील साधिका सौ. नीता दिलीप साळुंखे यांना शिकायला मिळालेली सूत्रे  

‘वर्ष १९९७ ते २०२३ या कालावधीत देवाने करवून घेतलेल्‍या साधनेमध्‍ये सौ. नीता दिलीप साळुंखे यांना शिकायला मिळलेली सूत्रे येथे दिली आहेत.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्‍या साधनेत ‘अंतर्मुखता’ या गुणाचे महत्त्व आणि ‘ती कशी साधावी ?’ याविषयी सनातनचे संत पू. उमेश शेणै यांनी केलेले विवेचन

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात वास्‍तव्‍यास असणारे सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांनी ‘अंतर्मुखता म्‍हणजे काय ?, ती नसल्‍यास होणारी हानी आणि ‘साधनेत अंतर्मुखतेचे महत्त्व किती अधिक आहे’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

साधकांशी सहजतेने संवाद साधून त्‍यांना घडवणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे !

भाद्रपद शुक्‍ल षष्‍ठी (२१.९.२०२३) या दिवशी सनातनच्‍या देवद, पनवेल येथील आश्रमात रहाणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचा ६१ वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त आश्रमात रहाणार्‍या कु. दीपाली माळी यांना सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सद़्‍गुरुराया, अशीच असीम गुरुकृपा असू द्यावी आम्‍हावरी ।

सद़्‍गुरु शक्‍तीरूपी चैतन्‍याचा हिमालय असेे देवद आश्रमी ।
साधकरूपी सुंदर सुगंधी फुले उमलली सनातनच्‍या वनी ॥ १ ॥

संस्‍कृत सुवचने

उद्धरेदात्‍मनात्‍मानं नात्‍मानमवसादयेत् ।
आत्‍मैव ह्यात्‍मनो बन्‍धुरात्‍मैव रिपुरात्‍मनः ॥ – श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ६, श्‍लोक ५
अर्थ : मनुष्‍याने आपल्‍या मनाद्वारे स्‍वतःची अधोगती होऊ न देता स्‍वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जिवाचे मित्र, तसेच शत्रूही आहे.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे जिवावर बेतलेल्‍या अपघातातून वाचल्‍यावर समष्‍टी सेवांचे दायित्‍व स्‍वीकारून नेहमी आनंदी रहाणारी कु. वैशाली नागेश गावडा !

मी महाविद्यालयात शिकत होते. १४.११.२०१६ या दिवशी दुपारी ३ वाजता मी दुचाकीवरून घरी येत होते. त्‍या वेळी पाठीमागून एक गाडी आली आणि ती माझ्‍या गाडीला धडकली.

गोवा : बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील धर्मांतराचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

प्रोफेट बजिंदर सिंग संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘लंगर’ सेवेच्या नावाखाली बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. पोलिसांनी कारवाई करून धर्मांतर करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती समारोहात खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !

या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्यावतीने त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी चर्चा केली. त्यांना समितीचा ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ, तसेच हलाल प्रमाणपत्र रहित करण्याच्या प्रक्रियेसंबंधीचे निवेदन देण्यात आले.

‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी’ आणि महापालिका यांच्या वतीने शहरात ५ सहस्रांहून अधिक छायाचित्रक बसवले !

नागरिकांमध्ये नियम पालन करण्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी कठोर शिक्षेसह त्यांची नीतीमत्ता उंचावण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणेही आवश्यक !

मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा ३० सप्टेंबरपासून दौरा चालू होणार !

आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे काम कसे चालू आहे ? त्याविषयी सरकारकडून अधिकृत काहीच माहिती आलेली नाही. त्यांनी माहिती दिली नाही, तरी हरकत नाही.