छत्रपती संभाजीनगर येथे रस्‍ता करण्‍यासाठी साचलेल्‍या गढूळ पाण्‍यात लोटांगण घालून नागरिकांचे आंदोलन !

शहरातील सातारा देवळाई भागातील बीड बायपास आणि बंबाटनगर भागातील अनेक वसाहतींत रस्‍त्‍यांची सुविधा नाही. या भागातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे रस्‍त्‍याची मागणी केली;

नागपूर येथे ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’चे समन्‍वयक सुनील घनवट यांचा सत्‍कार !

या वेळी मंदिर विश्‍वस्‍त श्री. चुडामण खडतकार आणि श्री. अशोक चौधरी, तसेच कानोलीबाराच्‍या बृहस्‍पती मंदिराचे अध्‍यक्ष श्री. रामनारायण मिश्र, हिंदु जनजागृती समितीचे नागपूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. अभिजित पोलके आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

वादळी वार्‍यासह पावसाने गोव्याला झोडपले : जनजीवन विस्कळीत !

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडल्याने संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित ! दक्षिण कोकण आणि गोव्याची किनारपट्टी या भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने १ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे.

गोव्यात आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर बंदी आणण्याचा विचार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे वक्तव्य

याचसमवेत सर्वत्र फोफावलेली भटक्या कुत्र्यांची समस्याही सरकारने गांभीर्याने आणि त्वरित सोडवणे अपेक्षित आहे !

एकमेवाद्वितीय हिंदु धर्म !

‘ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमीष दाखवावे लागते, मुसलमानांना धमकवावे लागते, तर हिंदु धर्मातील ज्ञानामुळे इतर पंथीय हिंदु धर्माकडे आकर्षित होतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आत्‍महत्‍या करू पहाणार्‍या मुंबईतील तरुणाचे प्राण वाचवले !

२८ वर्षीय तरुण गूगलवर ‘आत्‍महत्‍या करण्‍याची सर्वांत चांगली पद्धत’ शोधत होता. याविषयी इंटरपोलला माहिती मिळाल्‍यावर त्‍यांनी मुंबई पोलिसांना सतर्क केले. पोलिसांनी वेळीच तरुणाच्‍या घरी पोचत त्‍याचे प्राण वाचवले.

कृत्रिम तलावांपेक्षा नैसर्गिक तलावांना भाविकांची पसंती !

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या क्षेत्रात अनंतचतुर्दशीच्‍या दिवशी ८ सहस्र ६४१ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पहाटे ४ वाजेपर्यंत पार पडले. शहरातील आठही विभागांमध्‍ये नैसर्गिक तलावांसह २२ पारंपरिक मुख्‍य विसर्जनस्‍थळांवर ७ सहस्र ८६ आणि १४१ कृत्रिम तलावांवर १ सहस्र ५५५ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले.

हिंदु एकता आंदोलनाच्‍या वतीने गणेशोत्‍सव मंडळांच्‍या स्‍वागतप्रसंगी ‘हिंदु राष्‍ट्र आक्षेप आणि खंडण’ ग्रंथ भेट !

हिंदु एकता आंदोलनाच्‍या वतीने अनंतचतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्‍सव मंडळाच्‍या स्‍वागतासाठी कक्ष उभारण्‍यात आला होता. या स्‍वागत कक्षावर मंडळातील अध्‍यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शाळ, श्रीफळ आणि हिंदु जनजागृती समितीचा ‘हिंदु राष्‍ट्र आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट देण्‍यात आला.

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत डीजेमुळे मृत्‍यू !

आवाजाच्‍या मर्यादेचे उल्लंघन केलेल्‍यांवर तात्‍काळ आणि कठोर कारवाई करायला हवी. मिरवणुकीमध्‍ये पारंपरिक वाद्यांनाच अनुमती द्यायला हवी !