सुनील घनवट यांची संकटमोचन हनुमानाच्या चरणी प्रार्थना !

नागपूर, २९ सप्टेंबर (वार्ता.) – येथील बेलोरीच्या श्री संकटमोचन हनुमान मंदिरात महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दर्शन घेऊन ‘हिंदु राष्ट्र स्थापनेतील सगळी संकटे दूर होऊन लवकरच हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, यासाठी संकटमोचन हनुमानाच्या चरणी प्रार्थना केली. या वेळी श्री. घनवट यांचा सत्कार श्री अजयगिरीजी महाराज यांनी केला.
मंदिराचे अध्यक्ष माननीय श्री. दिलीप कुकडे यांनी मंदिराचा इतिहास, मंदिरात होत असलेले उपक्रम सांगून भविष्यात मंदिरात वेदपाठशाळा, वाचनालय चालू करणार असल्याचे सांगितले. ‘मंदिरात हिंदु राष्ट्र-जागृती सभाही घेणार आहोत’, असे ते म्हणाले.
या वेळी मंदिर विश्वस्त श्री. चुडामण खडतकार आणि श्री. अशोक चौधरी, तसेच कानोलीबाराच्या बृहस्पती मंदिराचे अध्यक्ष श्री. रामनारायण मिश्र, हिंदु जनजागृती समितीचे नागपूर जिल्हा समन्वयक श्री. अभिजित पोलके आदी मान्यवर उपस्थित होते.
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !