मुंबई – मुंबई लोकलमध्ये साखळी बाँबस्फोट करण्यात येणार असल्याची धमकी देणारा भ्रमणभाष मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने लोकलमध्ये बाँब ठेवल्याचे म्हटले. संपर्क नियंत्रण कक्षातील महिला पोलीस अधिकार्याने अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला; पण त्या व्यक्तीने कोणतेही उत्तर दिलेले नाही. विलेपार्ले परिसरातून संपर्क करत असल्याने तिने सांगितले; पण लोकेशन जुहू येथील दाखवत होते. अवघ्या काही घंट्यांत संबंधिताला अटक करण्यात आली असून त्याचे नाव अशोक शंकर मुखिया (वय २५ वर्षे) असे आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेविषयी सतर्क रहाण्याची सूचना संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
जुलैमध्येही मुंबई पोलिसांना २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या बाँबस्फोटांप्रमाणे पुन्हा आक्रमण करणार असल्याच्या धमकीचे संपर्क आले होते.
संपादकीय भूमिका
मुंबईवर कायमस्वरूपी असणारी आतंकवादाची टांगती तलवार दूर होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! |