गोव्यात शिवछत्रपती यांच्या पुतळ्यावर ११ ठिकाणी सामूहिक दुग्ध-जलाभिषेक !

पाद्रयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले आक्षेपार्ह विधान, यानंतर करासवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पार्श्वभूमीवर समस्त शिवप्रेमींनी संपूर्ण गोवाभर ‘श्री शिवछत्रपती सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा संकल्प केला.

भिवंडी येथे दुचाकी चोरणारी धर्मांधांची टोळी अटकेत !

लोकसंख्‍येत अल्‍पसंख्‍यांक असलेले धर्मांध गुन्‍हेगारीत मात्र बहुसंख्‍यांक !

शिवसेनेच्‍या आमदारांनी विधानसभा अध्‍यक्षांकडे सादर केले ६ सहस्र पानांचे लेखी उत्तर !

विधानसभा अध्‍यक्षांचे अधिकार अबाधित ठेवत सर्वोच्‍च न्‍यायालयाने या प्रकरणी निर्णय घेण्‍याचे निर्देश विधानसभा अध्‍यक्षांना दिले होते; मात्र नार्वेकर यांनी अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्‍यामुळे ठाकरे गटाने पुन्‍हा सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे.

‘पालट घडवूया’ अभियानाद्वारे राज्‍यातील ६४ सहस्र शाळांमधील ३८ लाख विद्यार्थी देणार स्‍वच्‍छतेचा संदेश !

विद्यार्थी ‘स्‍वच्‍छता मॉनिटर्स’ म्‍हणून काम करणार आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे २३ ऑगस्‍ट या दिवशी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘या अभियानाद्वारे राज्‍यातील स्‍वच्‍छतेमध्‍ये आमूलाग्र पालट होईल’, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला आहे.

युगपुरुषांची अपकीर्ती करणार्‍या प्रवृत्ती ठेचून काढायला हव्‍यात ! – खासदार उदयनराजे भोसले, भाजप

प्रसारमाध्‍यमांशी बोलतांना खासदार उदयनराजे भोसले म्‍हणाले, ‘‘युगपुरुष छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍याने एका मुलाला कह्यात घेण्‍यात आले आहे. या प्रकरणाचे सूत्रधार शोधून काढले जातील, गुन्‍हे अन्‍वेषणद्वारे याचे सखोल अन्‍वेषण करण्‍यात येईल

तलाठी भरती प्रक्रियेची चौकशी विशेष पोलीस पथकाद्वारे करा ! – जयंत पाटील, प्रदेशाध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

जयंत पाटील यांनी राज्‍यात काही परीक्षा केंद्रांवर पेपर फुटल्‍याचाही आरोप केला आहे. नुकतेच म्‍हाडाच्‍या भरती प्रक्रियेत अपप्रकार करणार्‍यांवर गुन्‍हे नोंदवण्‍यात आले आहेत.

शेरीनाल्‍यातील दूषित पाणी पुन्‍हा कृष्‍णानदीत !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ‘शेरीनाल्‍याची समस्‍या’ ही सुटलेल्‍या प्रमुख समस्‍यांपैकी एक आहे. प्रत्‍येक वेळी ठराविक दिवसांनी शेरीनाल्‍याचे दूषित पाणी थेट कृष्‍णा नदीत मिसळते.

छत्रपती संभाजीनगर शहरात ८ दिवसांआड पाणीपुरवठ्यामुळे शहरवासीय संतप्‍त

देशाच्‍या स्‍वातंत्र्याचा अमृतमहोत्‍सव झाल्‍यानंतरही राज्‍यातील काही शहरांची स्‍थिती अशी असणे, गंभीर आहे ! पाणीसमस्‍या लवकरात लवकर सोडवणे आवश्‍यक !

ईश्वरी कायदे आणि जमाखर्च यांचे महत्त्व !

‘पृथ्वीवरील कायदे आणि जमाखर्च इत्यादी सर्व व्यर्थ आहेत. शेवटी प्रत्येकाला ईश्वरी कायदे आणि जमाखर्च इत्यादींना सामोरे जावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले