मुली आणि महिला यांचे अश्‍लील व्हिडिओ सिद्ध करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या २ मुलांना पालघर येथून अटक !

कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आणि गुन्हेगारी न्यून करण्याचे दायित्व असणार्‍या पोलिसांनी स्वतःच्या मुलांच्या कृत्यांकडे किती लक्ष आहे ? घरातील गुन्हेगारीही रोखू न शकणारे पोलीस समाजातील गुन्हेगारी काय रोखणार ?

स्थानिक पातळीवरील जनता दरबार भरत नसल्याने नागरिकांची मंत्रालयात गर्दी !

सद्यःस्थितीत अनेक जिल्ह्यांत जनता दरबार भरतच नाहीत. त्यामुळे मंत्र्यांना निवेदने देण्यासाठी नागरिकांना थेट मुंबईत मंत्रालयात यावे लागत आहे.

आता ‘इस्रो’ मंगळ आणि शुक्र या ग्रहांवरही यान उतरवणार ! – ‘इस्रो’चे प्रमुख एस्. सोमनाथ

चंद्रयान-३ च्या यशस्वी अभियानाविषयी आनंद व्यक्त करतांना त्यांनी या यशाचे श्रेय शास्त्रज्ञांना दिले.

‘इस्रो’ सूर्याचा अभ्यास करणार्‍यासाठी पुढील मासात ‘आदित्य एल् १’ यान अवकाशात पाठवणार !

सूर्याचा अभ्यास करणारी ‘इस्रो’ची ही पहिलीच मोहीम आहे. या मोहिमेसाठी ३७८ कोटी रुपये खर्च येणार आहे. या मोहिमेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.

जागतिक कुस्ती महासंघाकडून भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित !

निवडणुका न घेतल्याचा परिणाम !

अजमेर (राजस्थान) येथे विद्यार्थिनींची कंबर आणि नितंब यांचा आकार मागणार्‍या शाळेच्या विरोधात पालकांचा संताप !

विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या खेळाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाने काही नियम ठरवून दिले आहेत. त्यांच्याकडे कानाडोळा करून अशा प्रकारे अनावश्यक माहिती मागवणार्‍या शाळा व्यवस्थापनावर कारवाई व्हायला हवी !

ब्रिक्स’ संघटनेत आणखी ६ देशांचा समावेश होणार !

ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ५ देशांच्या ‘ब्रिक्स’ (बी.आर्.आय.सी.एस्.) संघटनेमध्ये आता आणखी ६ देशांंचा समावेश करण्यात येणार आहे. येथे चालू असलेल्या १५व्या ‘ब्रिक्स’ परिषदेमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामफोसा यांनी ही घोषणा केली.

अहिल्यानगर येथून ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

घुसखोरांचा देश भारत ! खोटी कागदपत्रे बनवून घुसखोर भारतात प्रवेश करतात आणि पोलीस किंवा प्रशासन यांना याचा थांगपत्ताही लागत नाही, हे संतापजनक ! अशा घुसखोरांना भारतातून हाकलूनच द्यायला हवे !

पाकला चंद्रावर यान पाठवण्यासाठी आणखी २-३ दशके लागतील ! – अभिनेत्री सेहर शिनवारी

भारताच्या ‘चंद्रयान-३’च्या यशानंतर जगभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. अशातच पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी यांनी भारताचे कौतुक करून पाकच्या दुर्दशेविषयी दु:ख व्यक्त करणारे ट्वीट केले आहे.

आम्ही आधीपासूनच चंद्रावर रहात आहोत !

पाकिस्तानी नागरिकाची चंद्रयानाच्या यशस्वीतेवरून पाकवरच उपरोधिक टीका