बेंगळुरू – येत्या काही वर्षात ‘इस्रो’ मंगळ आणि शुक्र ग्रहांवरही यान उतरवणार आहे, अशीमाहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (‘इस्रो’चे) प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली. चंद्रयान-३ च्या यशस्वी अभियानाविषयी आनंद व्यक्त करतांना त्यांनी या यशाचे श्रेय शास्त्रज्ञांना दिले.
“The success of Chandrayaan-3 gives us the confidence to configure missions not only to the moon but also to Mars, Venus, and other planets and even asteroids.”
ISRO chief S. Somanath in response to OpIndia’s question.
(n/n) pic.twitter.com/KCrNyxiOoa
— OpIndia.com (@OpIndia_com) August 24, 2023
श्री. सोमनाथ पुढे म्हणाले की, भारताने केवळ दोन मोहिमांमध्ये हे यश मिळवले आहे. चंद्रयान-३ हे जागतिक दर्जाच्या उपकरणांसह संपूर्ण स्वदेशी मोहीम आहे. चंद्रयान-३ मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट ‘सेन्सर’ आणि सर्वोत्कृष्ट दर्जाचे उपकरणे आहेत.